शिक्षक मतदारांना येवला पैठणीचे प्रलोभन, उमेदवाराकडून मातोश्रीसम मायेची उधळण
निवडणूक आयोगाचे दरडावणे ठरले केवळ बुजगावणे
नाशिक/ प्रतिनिधी
निवडणूकीत मतदारांना प्रलोभने दाखवून मते मिळवणे आचार संहीतेचा भंग ठरतो. या कृतीस कारणीभूत असलेले कार्यकर्ते ज्या उमेदवाराचा प्रचार करतात त्या उमेदवाराविरूध्द आचारसंहीता भंग केल्याचा गुन्हा दाखल होतो. सदर उमेदवाराची उमेदवारी रद्द होऊ शकते आणि ज्यासाठी प्रलोभनाचा अट्टाहास केला तो उद्देश सफल होत नाही, अशी सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिलेली असतानाही नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक बाजारात येवल्याची पैठणी भाव खाऊ लागल्याने निवडणुक आयोगाचे दरडावणे केवळ बुजगावणे ठरल्याची चर्चा उच्च शिक्षित शिक्षक मतदारांमध्ये सुरू आहे.
येवल्याची पैठणी भल्याभल्यांना भुरळ घालते. त्यातच निवडणूक म्हटले की, हा येवल्याचा बाज दाखविण्याची खुमखुमी अनेकांना येते. पैठणीची भुरळ पाडून मतांंची बिदागी घेण्याचा असाच केविलवाणा प्रयत्न एका पैठणीबाज उमेदवाराने केल्याचे छायाचित्र प्राप्त झाले आहे.
संबंधित उमेदवार विभागातील एका नामवंत शिक्षण संस्थेशी संबंधीत असून एरवी या संस्थेतील कर्मचार्यांना मुलभूत हक्क नाकारणारे भाऊ आजकाल मातोश्री समान मायेची उधळण करू लागल्याने उच्चशिक्षित मतदार आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
या निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने विशेष निरिक्षक तैनात केलेले असतानाही आयोगाच्या डोळ्यात धुळ फेकून पैठणीचा साज चढवून मतदारांना सजविले जाऊ लागल्याने आचारसंहीतेचे दरडावणे केवळ बुजगावणे ठरल्याचा आक्षेप नोंदविला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे लोकमंथनला एका शिक्षक मतदाराने पाठविलेल्या या छायाचित्रात पैठणीसोबत संबंधीत उमेदवाराचे प्रचारसाहित्यही स्पष्ट दिसत आहे.