Breaking News

तीन दहशतवाद्यांचा खात्मा शोपिअनमध्ये लष्करावर ग्रेनेड हल्ला


श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून यात 3 स्थानिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. पुलवामामधील चटपोरा येथे झालेल्या या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी संबंधित दहशतवाद्यांना एका निवासी इमारतीमध्ये घेरले होते.
दरम्यान, लष्कराच्या गस्त घालणार्‍या पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला आहे. शोपिअन जिल्ह्यातील अहगम परिसरात हा हल्ला करण्यात आला. तर कुपवाडा परिसरात सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यामध्ये एक जवान जखमी झाला आहे. दरम्यान, सैन्याने परिसराला घेरले असून वेगाने शोधमोहीम हाती घेण्यात आली. कुपवाडा परिसरात सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून एका दहशतवाद्याला जवानांनी यमसदनी धाडले.