Breaking News

भाग्यलक्ष्मी पार्क मनपाकडे वर्ग करा अन् ड्रेनेज समस्या सोडवा

सोलापूर, दि. 24, जून - जुळे सोलापुरातील नवीन आयएमएस शाळेजवळ असलेल्या भाग्यलक्ष्मी पार्क येथे ड्रेनेज समस्या आहेत. तेथे चुकीच्या पद्धतीने काम झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिक ांना ड्रेनेज वाहिनीची समस्या जाणवत आहे. बिल्डरने भाग्यलक्ष्मी पार्कचे महापालिकेकडे हस्तांतरण केले नाही. महापालिकेने ते वर्ग करून घेऊन समस्या सोडवाव्या, अशी मागणी तेथील महिलांनी केली आहे. भाग्यलक्ष्मी पार्क येथे 108 घरकुल असून, बिल्डरने सामूहिक सांडपाण्याचे हौद केले. तेथे सांडपाणी संकलन झाल्यानंतर ते काढण्यासाठी नागरिकांना प्रमाणापेक्षा जास्त रक्कम द्यावी लागते. ती सोसायटी खासगी व्यक्तीकडे असल्याचे कारण देत महापालिकेकडून तेथे कोणत्याही प्रकारच्या सोयी देण्यात येत नाही. ड्रेनेज लाइन चुकीच्या पद्धतीने घतल्याचे दिसून येते. ती सोसायटी महापालिकेने वर्ग करून घ्यावे आणि नागरी सुविधा द्याव्यात, अशी मागणी महापौर शोभा बनशेट्टी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.