Breaking News

औषध निर्मिती, सौर ऊर्जेतील संशोधनाला पेटंट


सोलापूर - औषध निर्मिती व सोलर एनर्जी या दोन्हींना केंद्र सरकारकडून पेटंट मिळाले आहे. दिल्लीच्या कार्यालयाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. हे पेटंट आता 20 वर्षांसाठी असणार आहे. त्यानंतर पुन्हा नोंदणी करावी लागेल, अशी माहिती डॉ. अजित माणिकशेटे यांनी दिली. औषध निर्मिती क्षेत्रात सिन्थेसिस ऑफ स्किफ अ‍ॅण्ड बेस देअर ट्रान्सिसन कॉम्प्लेक्स यावर पेटंट मिळवला आहे. याचा कॅन्सर व टीबीच्या औषधामध्ये उपयोग होईल. हे पेटंट डॉ. अजित माणिकशेटे, वैशाली राजूरकर व ए. ए. आवताडे यांना मिळाले आहे. सोलापूर विद्यापीठाअंतर्गत महा विद्यालयातील शिक्षकांना मिळालेले हे पहिलेच पेटंट असू शकते. हे पेटंट औषध निर्मिती क्षेत्रात कॅन्सर, टीबी इत्यादी आजारासह प्रमुख आजारावर उपयुक्त असेल. दुसरे पेटंट सोलर एनर्जी यावरून असून त्याचा पेटंट क्र.295312 असा आहे. हे पेटंट वीज बचत व निर्मिती क्षेत्रात आमूलाग्र क्रांती करणारे असेल. पेटंट माजी प्राचार्य माणिकशेटे व इतरांच्या परिश्रमाने तयार केले आहे.