Breaking News

सातारा शहरात प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी 40 हजाराची दंडात्मक कारवाई

सातारा, दि. 24, जून - राज्य सरकारने शनिवारपासून प्लास्टिकबंदी लागूचे आदेश जारी केल्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शहरात पहिल्याच दिवशी आठ व्यवसायीकांवर 40 हजारांची दंडात्कक कारवाई केली. आरोग्य विभागाच्या धडक कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान प्रथम कारवाईत 5 हजार, दुसर्यांदा सापडल्यास 15 हजाराची दंडात्मक कारवाई होणार मात्र तोच व्यवसायीक पुन्हा तिसर्यांदा प्लास्टिक पिशव्या वापरताना सापडल्यास 25 हजार दंड व तीन महिने कारावास अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य निरीक्षक गणेश टोपे यांनी सांगीतले.

प्लास्टिकबंदी प्रभावी व्हावी यासाठी प्रथम प्लास्टिक उत्पादक कारखान्यांवर छापे टाकण्याची योजना आहे. प्लास्टिकची उत्पादने तयार करणार्या कारखान्यांवर तातडीने छापे टाकून गुन्हे दाखल क रा, असे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रशासनास दिले आहेत. पहिल्याच दिवशी राजेखान अत्तार, बुधवारपेठ चिकन दुकान, राजू कारंडे, कारंडे शु-मार्ट, 675 गुरूवार पेठेतील आक ाश बेंद्रे प्लास्टिक पिशव्या व थर्माकॉल, हिंदुराव तपासे शु-मार्ट दुकान, मोमिन अ‍ॅण्ड सन, रविवार पेठ, मरीआई कॉम्पलेक्समधील नवशाद हरीपील्ले, न्यू पुना बेकर्स, आणि रविवार पेठ भाजी मंडईतील रविंद्र कांबळे, यु एस. डिस्को रबर अशा आठ जणांवर प्रत्येकी 5 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई करत मुद्देमालही जप्त केला.
ही कारवाई पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे यांनी केली. पालिकेच्या धकड कारवाईमुळे शहरातील व्यापारी तसेच लहान मोठे व्यवसायीकांचे धाबे दणाणले आहेत. प्लास्टिक शोध मोहिम सुरूच रहाणार असून ज्यांच्याकडे प्लास्टिक पिशव्यांचा साठा मिळून येणार आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आरोग्य निरीक्षक गणेश टोपे यांनी बोलताना सांगीतले.