Breaking News

पुराणकाळात सणांचा पर्यावरणाशी सहसंबंध : लतिफराजे


पारनेर / प्रतिनिधी 
वटपौर्णिमा व पर्यावरण यांचा अतिशय जवळचा संबंध असून पुराण काळात सर्व सांचा पर्यावरणाशी सांगड घातलेली होती असे प्रतिपादन लतीफ राजे यांनी केले. पारनेर येथील सृष्टीमित्र परिवार व सामाजिक वनीकरण विभागामार्फत चिंचोली येथे वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित महिलांच्या हस्ते वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी सरपंच वैशाली पिंपरकर, सामाजिक वनीकरणचे वनक्षेत्रपाल बाबासाहेब वाघुलकर, सृष्टीमित्र परिवाराचे अध्यक्ष लतीफ राजे, संजय झंजाड, सतीश पिंपरकर, संदीप झंजाड आदी उपस्थित होते.
यावेळी चिंचोली येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वटवृक्षांचे रोपण व पूजन महिलांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना लतीफ राजे म्हणाले फक्त वटपौर्णिमेनिमित्तच नाही तर प्रत्येक वेळी वृक्षांचे संवर्धन केले पाहिजे. कारण मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. त्याचे दुष्परिणाम आज सर्वच सजीवांना भोगावे लागत आहे. याप्रसंगी उपस्थित महिलांना लतिफ राजे यांनी रोपवाटीकेत तयार केलेल्या तुळस, चिंच, आवळा, जांभूळ आदी फळ झाडांची रोपे महिलांना भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वनपाल गोरख जाधव, मिरा काळकुटे, सोमनाथ मंडले, प्रदिप पिंपरकर, साहेबराव भगत, मंगल घोरपडे, दिलीप पिंपरकर आदींनी प्रयत्न केले.