Breaking News

नकली सोने विकणार्‍या महिला पोलिसांच्या जाळ्यात


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
फरार आरोपिंचा शोध घेत असताना श्रीगोंदा पोलिसांना घायपतवाडी येथील काटवनात दोन संशयीत महिला दिसून आल्या, यामध्ये सारिका नितीन चव्हाण(वय 22), वैशाली रामदास चव्हाण (वय 21) दोन्ही रा. गुंडेगाव ता.जि.अ.नगर त्यांचेकडे विचारपूस करून, त्यांची झडती घेतली असता, त्यांचेजवळ 1 किलो वजनाच्या पिवळ्या रंगाच्या बनावट पिळ्याच्या अंगठ्या मिळून आल्या. त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की मुंबई येथील लोकांना आम्ही 5 लाख रूपयांत 1 किलो सोने देतो असे, सांगून येथे बोलावले होते, असे सांगितल्याने सदर महिलांना पोलिस स्टेशनला आणले असून पुढील कारवाई सुरू आहे. सदरची कारवाई श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पो.नि. बाजीराव पोवार, उप. निरिक्षक महावीर जाधव, पो.कॉ. प्रकाश वाघ, पो.कॉ. रवी जाधव, पो.कॉ. अविनाश ढेरे, पो.कॉ. उत्तम राऊत, पो.कॉ. अमोल शिंदे, पो.कॉ. अविंदा जाधव यांचे पथकाने केली.