Breaking News

‘पदवीधर’प्रमाणे पत्रकार मतदारसंघाची स्थापना करा


श्रीरामपूर प्रतिनिधी

पदवीधर मतदार संघाप्रमाणे पत्रकार मतदार संघ स्थापन करा, अशा मागणीचे निवेदन पावसाळी अधिवेशात देणार येणार आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात आमदार आणि मंत्र्यांना यासंदर्भात निवेदन देण्याची तयारी सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दताञय खेमनर यांनी दिली. 

राज्यातील पत्रकारांच्या न्याय्य-हक्कासाठी व पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकार पेन्शन योजना, पत्रकारांना रेल्वे, बस प्रवास तसेच राज्यात टोल माफी यासंदर्भात पत्रकारांचा प्रतिनिधी विधान परिषदेमध्ये असावा, यासाठी हे निवेदन देण्यात येणार आहे. महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविदास बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली छायाचित्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण शेलार, राज्य संपर्क प्रमुख किरण शिंदे, उतर महाराष्ट्र उपाध्यक्ष रामनाथ जहाड, अशोक दुशिंग, राजेंद्र बनकर, जिल्हापाध्यक्ष दिलीप लोखंडे, अमोल राखपसरे, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र उंडे आदी यासाठी प्रयत्नशील आहेत.