Breaking News

दरंदले यांना ज्येष्ठ पत्रकार अधिस्विकृती प्रमाणपत्र प्रदान

सोनई प्रतिनिधी

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्यावतीने सोनई येथील ज्येष्ठ पत्रकार सोपानराव दरंदले यांना ज्येष्ठ अधिस्विकृती प्रमाणपत्र समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. शनिशिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. 

प्रारंभी शिर्डी येथील माहिती अधिकारी गणेश फुंदे यांनी प्रास्ताविक केले. नेवासा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक दरंदले स्वागत यांनी केले. जिल्हा माहिती अधिकारी दिपक चव्हाण यांनी दरंदले यांना महाराष्ट्र शासन ज्येष्ठ अधिस्विकृती पत्र प्रदान केले.

यावेळी नाशिक विभागीय अधिस्विकृती कार्यालयाचे सदस्य नवनाथ दिघे, शनैश्वर देवस्थानचे चिटणीस अप्पासाहेब शेटे, विश्वस्त भागवत बानकर, विश्वस्त शालिनी लांडे, सोनईचे माजी सरपंच हरिभाऊ दरंदले, माजी उपसरपंच जालिंदर चांदघोडे, डाॅ. बाबासाहेब शिरसाठ, डाॅ. रजनी शिरसाठ, पोलीस पाटील सयाराम बानकर, देवस्थानचे सहाय्यक कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले, राजेंद्र लांडे, पत्रकार संजय वाघ, गणेश जोशी, विजय खंडागळे, प्रकाश येळवंडे, पंकज दराडे, किशोर घावटे आदी उपस्थित होते.