परजणे गटाचे कार्यकर्ते कोल्हे गटात!
कोेपरगांव शहर प्रतिनिधी
तालुक्यातील संवत्सर येथील परजणे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हे गटात प्रवेश केला. त्याबददल त्यांचा संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, संजीवनी कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर परजणे, संजीवनी पतसंस्थेचे संचालक, राजेंद्र परजणे आदी उपस्थित होते. संवत्सर परिसरातील रत्नाकर काळे, दिनेश बोरनारे, राकेश जगताप, संतोष दशरथ ससाणे, सुधाकर बोरनारे यांनी परजणे गटाला सोडचिठ्ठी देत कोल्हे गटात प्रवेश केला.
यावेळी बोलतांना संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे म्हणाले, संवत्सर परिसरात संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी शासन तसेच कारखान्याच्यावतीने असंख्य विकासाची कामे केली आहेत. आ. स्नेहलता कोल्हे यांनीदेखील रस्ते वीज, पाणी या प्रश्नांना प्राधान्य देत शासनाचा निधी आणून कामे पूर्ण केली. युवक कार्यकर्त्यांनी विकासाला साथ देऊन कार्यरत रहावे. याप्रसंगी कोपरगांव तालुका भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकूंद काळे, महेश परजणे, विकी बोरनारे आदी उपस्थित होते. शेवटी संचालक ज्ञानेश्वर परजणे यांनी आभार मानले.