कहांडळ विद्यालयाचा १०० टक्के निकाल
संगमनेर : देवकौठे ( चोरकौठे ) येथील रमाजी गेणूजी कहांडळ विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रा. संजय लहारे यांनी दिली. प्रियंका संजय धाकतोडे ही ९१. ८० टक्के गुण मिळवून प्रथम आली. ९१ टक्के गुण मिळवून पुनम नवनाथ मुंगसे द्वितीय तर ९० टक्के गुण मिळवून ऋतुजा गणपत सोनवणे तृत्तीय क्रमांकांनी उत्तीर्ण झाली. मुख्याध्यापक संजय लहारे, शरद शेवंते, देवराम वाळुंज, राजाराम मुंगसे, अनिल भोसले, गाडेकर डी. सी., वारुक्षे आर. एन., खरात ए.जी., सोनवणे आर. जी., विलास ठाकरे, चत्तर आर. एन., संदीप सोनवणे, मंगेश चव्हाण आदींचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्य्यांचे माजी शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, स्कूल कमिटीचे अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक भारत मुंगसे, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवतराव आरोटे, शॅम्प्रोचे संचालक सुभाष सांगळे, निलकमल उद्योग समुहाचे संचालक एकनाथ मुंगसे, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कहांडळ, पोलीस पाटील शत्रुघ्न मुंगसे, काशिनाथ त्र्यंबक कहांडळ आदींनी अभिनंदन केले.