मिशन शौर्यमधील विद्यार्थ्यांच्या पाठीवर मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप
सह्याद्री अतिथीगृह येथे मिशन शौर्यमधील एव्हरेस्टवीरांचा गौरवसोहळा आज आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला वित्तमंत्री सुधीर मुनंगटीवार ,आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा ,क्रिडामंत्री विनोद तावडे ,पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह प्रधान सचिव मनिषा वर्मा उपस्थित होत्या.
आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने करण्यात येत असलेल्या प्रयत्नातील हे महत्वाचे पाऊल असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी एव्हरेस्ट पादाक्रांत केल्याबदल मुलांचे कौतुक केले.
