राज्यात पावसाची हजेरी
पुणे : राज्यात मान्सूनपूर्व पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावण्यास सुरूवात केली असून, या पावसाने उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार तडाखा दिला. शनिवारी दुपारपासून मोसमी पावसाने पुण्यासह राज्यात हजेरी लावली आहे. वातावरणात प्रचंड उकाडा वाढला असता दुपारपासून राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होऊन वातावरणातील बदलाने पाऊसाला सुरूवात झाली. औरंगाबादमध्ये पावसाची जोरदार एंन्ट्री झाली, असून शहरात सर्वीकडे तुंबलेले पाणीच पाणी पाहायला मिळाले. नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी वादळी वार्यासह गारपीट आणि मान्सूनपूर्व पाऊस अचानक झाला. या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झाले. त्यामुळे आधीच विविध कारणांनी बेजार झालेल्या शेतकर्यांच्या अडचणींत या पावसानं आणखीन भर पडली. नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली-भगुर या गावांमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. पावसासोबत काही भागात जोरदार गारपीटदेखील झाली. या पावसामुळं भाजीपाल्याचं अतोनात नुकसान तर झाले. पण, डाळिंब, द्राक्षबागांनाही मोठा फटका बसला. विजेचे खांब, झाडे, शेड आदींचे देखील मोठे नुकसान झाले आहे.
औरंगाबाद भागात पावसाने जोरदार वा़र्यासह दमदार हजेरी लावली. औरंगाबाद शहरात एन-2 सिडको परिसरात पुर परिस्थिती निर्माण झाली. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. सातारा, महाबळेश्वर, मनमाड, नाशिक, पिंपरी, रावेर, जालना, रत्नागिरी, चिपळून, आणि रायगड बहुतांश ठिकाणी जोराच्या वाऱयासह पावसाने दमदार हजेरी लावली. बहुतांश ठिकाणी शहरासह ग्रामीण भागातही पाऊस झाला. पूर्व भागात या पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. या झालेल्या पावसामुळे शहरातील काही ठिकांणांच्या रस्त्यांवर पाणी साचले दिसून आले. जळगाव, पिंपरी- चिंचवडमध्ये वादळीवाऱयाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱयांचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले.