शेतकरी संप तीव्र करण्याचा संघटनांचा इशारा शेतक़र्यांंकडून शेतमालाची विक्री बंद ; भाजीपाला महागला
मुंबई : देशभरातील शेतकरी आपल्या विविध मागण्यासाठी शुक्रवारपासून संपावर गेले असून, त्याचे पडसाद सलग दुसर्या दिवशी देखील देशभरात बघायला मिळाले.सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागण्यांसाठी सुरू असलेला संप आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. त्यासाठी येत्या 7 तारखेपासून शहरांना पुरविण्यात येणारी सर्व रसद तोडण्याचा निर्णय शेतकरी संघर्ष समितीने घेतला आहे. यामुळे शहरांमध्ये भाजीपाला महागण्याची शक्यता आहे. शेतकरी संपामुळे भाजीपाल्यांचे भाव कडाडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. संपाच्या दुसर्या दिवशी शेतक़र्यांंकडून शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर दुप्पट झाले आहेत. शेतक र्यांकडून शेतमालाची विक्री बंद असल्याने भाजीपाला महागला आहे. किसान महासंघाच्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी 10 जूनपर्यंत संपावल असतील. पुढील दहा दिवस हा संप सुरू रा हिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामन्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे. परिणामी मार्केटमध्ये शनिवारी भाज्यांचे दर दुप्पट झाल्याचे पहायला मिळाले. पुढील दहा दिवस हा संप जर सुरु राहिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट प रिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा क ाढण्याची मागणी भाजी व्यापारी करत आहेत.
संपाच्या पहिल्या दिवशी या संपाची तीव्रता इतकी जाणवली नव्हती. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यातील शेतकर्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला होता. परंतु आज या संपाची तीव्रता मोठया प्रमाणावर जाणवतांना दिसून येत होती. कारण आज मोठ्या शहरातील बर्याच भाजीपाला मार्केटमध्ये आवक घटल्याचे वृत्त येत आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सुपेकरवाडी येथे शेतकर्यांनी दूध रस्त्यावर ओतून केले आंदोलन. शेतकरी अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देत आहेत, शेतीमाल न विकण्याच्या निर्णयाने ग्राहकांची मोठी गैरसोय होणार आहे.