येवले तालुक्यात जुन्या ट्रॅक्टर दलालांचा सुळसुळाट
लाल कांद्याना कधी नव्हे तो भाव मिळाल्याने सामन्य शेतकरी आनंदीत झाला.दोन पैसे पदरात पडल्याने मोटारसायकल नसलेल्या शेतकर्यांनी शेतीला उपयुक्त ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी हालचाल सूरू केली आणि नेमकी हीच संधी साधत ट्रॅक्टर दलालांकडून शेतकर्यांची फसवणूक सुरू झाली येवले तालुक्यात शेतीत नगदी पिक म्हणून कांदा हमखास घेतला जातो पोळ, लाल, उन्हाळ या तिन्ही प्रकारचा कांदा घेण्यात येतो. वास्तविक आस्मानी आणि सुलतानी या दोन्ही संकटाना समोरे जातं कांदा घेतला जातो. भावाची अथवा पिकाची कुठलीच हमी नसलेल्या कांद्याच्या पिकाशिवाय या परिसरातील शेतकर्यांना पर्याय नाही. अपुर्या पावसात पाण्याचा भरवसा नाही त्यात हातात पैसा मिळेल असें दुसरे पीकही घेता येत नाहीं. कधी नव्हे एवढा भाव या वर्षांत लाल कांद्याला मिळाला. एका ट्रॅक्टरचे 90 हजार ते लाख रुपये मिळू लागल्याने शेतकरी समाधानी झाला.शेतकर्यांचा हातातील पैसा पाहून ट्रॅक्टर दलालांचा सुळसुळाट वाढला. ज्या शेतकर्यांनकडे मोटारसायकल नव्हती त्या शेतकर्यांना टॅक्टर घेण्याचे स्वप्न दलालांनी दाखवले. दीड ते दोन लाखात ट्रॅक्टर मिळत असल्याने शेतकरी खरेदी साठी तयार होऊ लागले. कागदपत्रे मिळून जातील असे लबाड आश्वासन देणार्या दलालांवर भरोसा ठेऊन ट्रॅक्टरची खरेदी केलेल्या शेतकर्यांना कागदपत्रे मिळत नसल्याने अनेक शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत. येवले तालुक्यात अशा दलालांचा सुळसुळाट झाला असून पोलिस यंञणा याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते. एरव्ही एखादा भुरट्या चोराला पकडून त्याची फुशारकी मारणार्या पोलिसांनी या प्रकारचा व्यवहार र करणार्या दलालांचा माग काढल्यास अनेक शेतकरी दुवा देतील.
