Breaking News

पालिकेचा गलथान कारभार ; अवजड मालाने भरलेल्या टेम्पोला अपघात

पुणे - पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथील अर्धवट काम झालेल्या डीपी रस्त्यामध्ये एक विहीर आहे. या विहिरीत शनिवारी रात्री एक अवजड मालाने भरलेला टेम्पो पडला. सुदैवाने चालक या अपघातून बचावला आहे. वाकड येथील विनोदेनगर ते अक्षरा शाळा या 18 मीटर डीपी रस्त्याचे काम संथगतीने सुरु आहे. स्थानिक शेतकर्‍यांनी देखील हे काम त्वरित पूर्ण करावे, याबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या असे असूनही महापालिकेला याबाबत गांभीर्य नाही. 


हेच शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास झालेल्या अपघातावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे महापालिकेला जाग येणार तरी कधी त्यांचा गलथान कारभार वाहनचालकांच्या जीवावर बेतत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. संत तुक ाराम कार्यालय ते ताथवडे शिव या 24 मीटर डीपी रस्त्याचे काम तब्बल 3 वर्षांपासून सुरू आहे. या अर्धवट असलेल्या ऐन रस्त्यात 20 ते 25 फूट खोलविहिर असून, या वि हिरीला कुठलेही संरक्षण कठडे अथवा आवरन नाही. महापालिका एकतर ही रस्त्यात असलेली विहीर बुजवत नाही किंवा तिला कठडेदेखील घालण्यात न आल्याने शनिवारी या विहिरीत अवजड मालाने भरलेला टेम्पो गेला. बाळू काळे हा टेम्पो चालक नशीब बलवत्तर म्हणूनच तसेच विहिरीत पाणी नसल्याने या अपघातातून सुखरूप बचावला. त्याला स्था निक तरुणांच्या मदतीने वर काढण्यात आले. तर क्रेनच्या सहाय्याने रविवारी सकाळी टेम्पो विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. 
येथील संत तुकाराम मंगल कार्यालय ते विनोदेनगर (ताथवडे शिव) हा 24 मीटरचा अवघ्या 1.3 किमी व सिल्वर स्पून हॉटेल ते अक्षरा स्कूल हा 18 मीटर आणि 800 मीटर रुंदीच्या रस्त्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. यासाठी बाधित शेतकर्‍यांनी जमिनी हस्तांतरित करून देखील रस्त्याचे काम अद्याप पूर्ण होऊ न शकल्याने रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. येत्या 4 -5 दिवसांनी येथील शाळा सुरू होणार आहेत. या रस्त्याने विद्यार्थ्यांना ने-आण करणार्‍या असंख्य बस याच रस्त्यावरून धावतात. तर पावसाळा देखील अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना येथील धोकादायक विहीर बुजवून रस्त्याचे काम त्वरित पूर्ण गरजेचे आहे. अन्यथा, एखादा मोठा अपघात नाकारता येत नाही.