Breaking News

शेतकर्‍यांनी टोकाची भूमिका घ्यावी - शरद पवार

मुंबई : सरकारला आश्‍वासनांचा विसर पडला असून, सरकार शेतकर्‍यांप्रती उत्तरदायी असल्याचे वागतांना दिसून येत नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी आता टोकाची भूमिका घेतली पा हिजे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. केंद्र सरकार कोणतीच अंमलबजावणी करत नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. बळीराजा सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. तो कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करण्याची टोकाची भूमिका घेत आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी समाजातील सर्व घटकांनी उभे रहावे असे आवाहन करतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी म्हणून शेतकर्‍यांच्या संघर्षाला साथ देत असल्याचे जाहीर केले. शेतकर्‍यांनी हे आंदोलन आता मागे घेता कामा नये असे देखील पवार यांनी यावेळी म्हटले आहे. 
एक शेतकरी म्हणून शेतकर्‍यांच्या संपाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मी संपकरी शेतकर्‍यांना धान्याची आणि दुधाची नासाडी करू नका एवढाच सल्ला देईन. सरकार विरोधातला लढा तुमची आश्‍वासने मान्य झाल्याशिवाय मागे घेऊ नका असेही शरद पवारांनी म्हटले आहे. तर भाजपाने शरद पवार शेतकर्‍यांना चिथावणी देत आहेत असा आरोप के ला आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागोजागी सांगितले की, उत्पादन खर्च अधिक 50 टक्के फायदा हा शेतीमालाच्या किमतीचा आधार धरला जाईल आणि त्या पद्धतीने पाऊले टाकली जातील. पण या गोष्टीची अंमलबजावणी गेल्या चार वर्षात झालेली नाही. सरकारने याची अंमलबजावणी करावी अशी मागणी शेतकरी काही पहिल्यांदाच करत नाहीत. गेल्या दोन-तीन वर्षांत कधी दिल्लीला, कधी दक्षिण भारतात, कधी उत्तर प्रदेशात तर कधी मध्यप्रदेशात तर कधी आपल्या महाराष्ट्रात शेतक री सातत्याने रस्त्यावर येवून आपली भूमिका मांडत आहेत असेही शरद पवार म्हणाले.
केंद्र सरकारने आणि ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तिथे सांगितले की, आम्ही या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहोत. त्यांनी असेही सांगितले की सरकार मोठ्या प्रमाणात कर्जमाफी देखील करणार आहे. ही अंमलबजावणी आजही होत नाही म्हणून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. माझी देशवासियांना विनंती आहे की, बळीराजा काही सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. समाजातील इतर घटकांनी शेतकर्‍यांच्या या आंदोलनात शेतकर्‍यांच्या पाठिशी उभे रहावे. हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनाचा कार्यक्रम नाही. शेतकर्‍यांच्या या संघर्षाला साथ दिली पाहिजे असेही शरद पवार यांनी सांगितले.