Breaking News

जम्मू-काश्मीरच्या शोपियांमध्ये ग्रेनेड हल्ला 4 पोलिसांसह 16 नागरिक जखमी


श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 4 पोलिसांसह 16 नागरिक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शोपियन शहरातील पोलीस ठाण्यावर काही दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. ग्रेनेड आपले लक्ष्य चुकवून रस्त्याच्या कडेने जाऊन फुटले. यामध्ये पोलिस व नागरिक जखमी झाले.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी परिसरात नाकेबंदी करण्यात आली असल्याची माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली. या हल्ल्यात एक विद्यार्थी आणि एक स्त्रीदेखील गंभीर जखमी झाली आहे. त्यांना शोपियांच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागच्या काही दिवसांपासूनचा हा 10वा ग्रेनेड हल्ला आहे.