Breaking News

नीट परिक्षेत नांदेडचा कृष्णा देशात सातवा सीबीएसईच्या ’नीट-2018’ चा निकाल जाहीर


नवी दिल्ली : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षेचा निकाल सीबीएसईकडून जाहीर करण्यात आला आहे. कल्पना कुमारी ही ऑल इंडिया रँकमध्ये पहिली आली असून, तिला 720 पैकी 691 गुण मिळाले आहेत. महाराष्ट्रातील नांदेड जिह्यातील कृष्णा अग्रवाल हा तरुण देशात 7 वा आला असून, कृष्णाला 720 पैकी 685 गुण मिळाले आहेत. तसेच, कृष्णा बायोलॉजी विषयात देशात पहिला आला आहे. कृष्णाचे वडील आशिष अग्रवाल हे बालरोगतज्ञ आहेत, तर आई डेंटिस्ट आहेत.यंदाचा नीट परीक्षेचा कट आ ॅफ घसरला असून, जनरल कॅटेगरीसाठी यावषी 50 टक्के म्हणजे 720 पैकी 119 मार्क्स आहेत. मागच्या वषी हा कट ऑफ 131 होता. तर ओबीसी, एससी, एसटीसाठी हा कट ऑफ 40 टक्के म्हणजे 720 पैकी 96 मार्क्स असणार आहे, जो मागच्या वषी 107 होता. यंदा 7 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी कौन्सिलिंग राऊंडसाठी पात्र ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सकाळी निकालाच्या घोषणेवर स्थगिती आणण्याची याचिका फेटाळून लावल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला. वैद्यकीय सेवांमध्ये स्नातक पदवी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट परीक्षा घेण्यात येते. यावर्षी देशभरातील 13 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. 6 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेच्या अचूक उत्तरांची यादी 25 मे रोजी जाहीर करण्यात आली होती. नॅशनल ह्युमन राईट कमिशनने परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी राज्याबाहेर जावे लागल्यामुळे झालेल्या त्रासाच्या विरोधात माध्यमांमधील वृत्तांच्या संदर्भाद्वारे 8 मे रोजी याचिका दाखल केली होती. देशभरातील 13,26,725 उमेदवारांनी नीटची परिक्षा दिली होती. एमबीबीएस, बीडीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी सीबीएसईकडून ही प्रवेश परिक्षा घेतली जाते. नीटचा निकाल 5 जून रोजी जाहीर होणार होता. मात्र, एक दिवस आधीच निकाल जाहीर करण्यात आला आहे. वैद्यक ीयसाठी नीट प्रवेश परिक्षा 6 मे रोजी घेण्यात आली होती. देशभरात यासाठी 2255 केंद्रांवर ही परिक्षा झाली होती. देशभरात हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, मराठी, ओरिया, बंगाली, आसामी, तेलगू, तमिळ आणि कन्नड या भाषांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली होती.