Breaking News

दूध प्रश्‍न सोडविण्यात सरकार अपयशी : देशमुख राजहंस स्ट्रॉलचे थाटात उदघाटन

संगमनेर प्रतिनिधी

भाजप सरकार सत्तेत येऊन पाच पूर्ण होत आली आहेत. मात्र तरीही जनता त्रस्तच आहे. सामान्य नागरिकांच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने घेतला नाही. उद्योगपती धार्जिणे असलेल्या या सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची जाणीव नाही. दूध दराचा प्रश्‍न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे, असे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी केले.

घारगांव येथे राजहंस दूध विक्री स्टॉलच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत जि. प. कृषी विभागाचे सभापती अजय फटांगरे, दूध संघाचे संचालक सुभाष आहेर, तुळशीराम भोर, पंचायत सदस्या प्रियंका गडगे, अरुण वाघ, गावचे सरपंच सुरेश कान्होरे, अरुण वाघ, रमेश आहेर, गोकुळ कहाणे, सर्जेराव ढमढेरे, नाना भालके, शांताराम तागडकर, अशोक गाडेकर, विठ्ठल गाडेकर, रामदास आभाळे, गणेश डोंगरे, शांताराम गाडेकर, कर्पे महाराज आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना देशमुख म्हणाले, वाढीव दुधाची परिस्थिती हाताळता न आल्यामुळे दुधाच्या दरावर परिणाम झाला आहे. दुधाचे खरेदी - विक्रीचे दर पूर्वी शासन ठरवित होते. त्याकाळी शासनाचा सहभाग हा दुधाची खरेदी, विक्री, पावडर निर्मिती यामध्ये होता. त्यामुळे शासनाने निश्‍चित केलेल्या भावाप्रमाणेच दूध उत्पादकाला दर मिळत होते. काळाच्या ओघात शासनाने दूध विक्री, खरेदी तसेच पावडर निर्मितीमधून आपला सहभाग कमी केला. शासन अशाप्रकारे शेतकर्‍यांची पिळवणूक करीत आहे. यावेळी पसिरातील दूध उत्पादक, शेतकरी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.