Breaking News

समुदायिक विवाह सोहळ्यातून ‘संजीवनी’ची नेत्रदीपक कामगिरी

कोपरगांव शहर प्रतिनिधी : 

सनई चौघड्यांचा सूर, उंट, घोडे आणि पाहुणेमंडळींच्या लव्याजम्यात काढण्यात आलेली नवरदेवांची भव्य अशी मिरवणूक मोठी लक्षवेधी ठरली. निमित्त होते, शहरात आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा. यातून संजीवनी प्रतिष्ठानने नेत्रदीपक कामगिरी पार पडली. 

तहसील कार्यालयाशेजारील मैदानावर उभारण्यात आलेला भव्य शामियाना आणि आलेल्या हजारो व-हाडींना सुरूची भोजन अशा शाही थाटात सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे तसेच ज्येष्ठ नेते, माजीमंत्री शंकरराव कोल्हे, सिंधुताई उर्फ माई कोल्हे आणि संत महंतांच्या उपस्थितीत २८ जोडपी या सोहळयात विवाहबद्ध झाली. संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या सर्वधर्मीय सोहळयाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. वधूवरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे संत रमेशगिरी, अध्यक्ष मोहनराव चव्हाण, जंगलीदास आश्रमाचे देवानंद, रामानंदगिरी, नंदगिरी उंडे महाराज, हभप सोपानकाका करंजीकर, मौलाना हाफीज महंमदखान, भंते कश्यप, फादर फ्रान्सीस खेडेकर, अजय भोसले, बाबा हार्दिक सिंग, आ. स्नेहलता कोल्हे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, उद्योजक डाॅ. मिलींद कोल्हे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हेे, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, विधीज्ञ रविंद्र बोरावके, शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा योगिता शेळके, अभय शेळके, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, प्रणव पवार, रविंद्र काळे, प्रमोद जगताप, विजय वाजे, सेनेचे कैलास जाधव, संजय सातभाई, भाजपा तालुकाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, बाळासाहेब पानगव्हाणे, संजीवनीचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, पराग संधान मनोहर शिंदे आदींसह नगरसेवक, संजीवनी कारखान्याचे सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आवर्जून या सोहळ्याला उपस्थित होते. 

नाम फाउंडेशनचे सर्वेसर्वा, प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले, संत महंतांनी सामाजिक विवाह सोहळे होण्यासाठी मोठा प्रचार व प्रसार करावा. त्यातून सामाजिक उपलब्धी होईल. ज्याप्रमाणे ‘एक गांव एक गणपती’ उपक्रम राज्यभर राबविला जातो, त्याप्रमाणे आता ‘एक गांव एक मंडप’ असा उपक्रम राबविण्यात यावा. नाम फाउंडेशनच्यावतीने १७ जिल्हयात धर्मदाय आयूक्त शिवकुमार डिगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामुदायिक विवाह सोहळयांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये एकाचवेळी ३ हजार ४० जोडपी विवाहबध्द झाली. हल्लीची सामाजिक व्यवस्था बदलण्याची गरज आहे. हुंडा घेईल तो नामर्द समजावा. पत्नीच्या रूपाने येणा-या लक्ष्मीचा अपमान करू नका. युवा नेते विवेक कोल्हे यांनी तरूणांचे संघटन वाढवून सामाजिक कार्यात योगदान देऊन तरुणांच्या साथीने नवनवीन उपक्रम राबवावेत. सहकाररत्न माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या अभिष्टचिंतन वर्ष सोहळयानिमीत्त प्रथमच कोपरगांव तालुक्यात हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतू पार पडलेल्या या सर्वधर्मीय विवाह सोहळयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विवाह सोहळयाचे सूत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले. दरम्यान, आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, विवेक कोल्हे यांच्या व्यक्तिगत विवाहापेक्षा मला या सामुदायिक विवाह सोहळयाचा अत्यानंद झाला. असे उपक्रम यापुढील काळात राबविण्याची गरज आहे. प्रा. साहेबराव दवंगे यांनी सूत्रसंचलन केले. 

चौकट

‘नाम’साठी दिले ३ लाख ! 

सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या अधिपत्त्याखाली सुरू असलेल्या सामाजिक कार्यात नाम फाउंडेशन संस्थेला संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने ३ लाख एक रूपयांचा धनादेश ज्येष्ठ नेते, माजीमंत्री शंकरराव कोल्हे आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला.