नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह पुढील आठवड्यात दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौर्यावर जाणार आहेत. 7 आणि 8 जून रोजी ते काश्मीरला भेट देतील. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प रिस्थितीवर ते चर्चा करतील. दरम्यान, सुरक्षा दलाने सामान्य नागरिकांवर केलेल्या गोळीबारात संपूर्ण काश्मिर खोर्यात बंद पाळण्यात आला. श्रीनगरमधल्या अनेक ठिकाणी तसेच काश्मीरच्या खोर्याच्या काही भागांमध्ये संचारबंदी घालण्यात आली आहे.