Breaking News

देशमुखांना मंत्रीपदावरुन दूर करा


राज्य मंत्रिमंडळातील अजून एक मंत्री अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरात असणारा बंगला हा बेकायदेशीर असल्याचा अहवाल महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे. तर या प्रकरणी जो न्याय एकनाथ खडसे यांना दिला तोच देशमुख यांना लावून त्यांना मंत्रिपदावरून दूर करावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभाग आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित असलेल्या या बंगल्यावरून वाद सुरु होता. विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हा प्रश्‍न अ धिवेशनात लावून धरला होता.