घावटे यांच्या अटकेला पोलिस ठाणे शुशोभिकरणाची प्रकरणाची किनार
पारनेर तालुक्यातील जवळा येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांना पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी न केलेल्या गुन्ह्यांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी अटक केली होती.गेल्या फेब्रुवारी महिण्यात जवळा येथे कांदयाचा ट्रकची रस्ता लुट करताना ग्रामस्थांनी लुटमार करणार्या दरोडेखोरांना पकडून पोलिसांचे ताब्यातही दिले होते. परंतु चोरटे गावातीलच युवक असल्याने नातेवाईकांनी निघोज पोलिसांनी पोलिसांशी संगनमताने (आर्थिक तडजोडीतुन) ट्रक चालक व निघोज येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायीक फिर्यादी सुर्यकांत प्रकाश कवाद व जवळा येथील पकडलेला चोरट्याला पळून जाण्यास मदत केली. या सर्व प्रकाराचे छुपे चित्रीकरण जवळा येथील सा. कार्यकर्ते रामदास घावटे यांनी केले होते.
घावटे यांनी पकडून दिलेला पाच मिनिटांत तुमच्या हातुन पळून जातो कसा? यावर आक्षेप घेत, घडलेला सर्व प्रकार सोशल मिडीयावर प्रसारीत केला. पोलिस अधिक्षक यांचेकडे पुराव्यांसह तक्रार केली होती, त्यावर त्यांनी चौकशी करुन दोषी पोलिसांवर कारवाईचे आश्वासनही दिले होते.
परंतु पुढे निघोज पोलिसांनी याचा राग मनात धरून ट्रक चालक, चोरटा, यांच्याशी संगनमत करुन चोरटा पकडून देणारे घावटे यांचेवरच गुन्हा दाखल केला.
पुढे बेकायदेशीरपणे निधी जमवून पोलिस ठाण्याचे शुशोभिकरण केल्याची तक्रार घावटे यांनी केल्याने, सुमारे चार महिण्यापुर्वीच्या दाखल गुन्हात अटक केली. सदर गुन्ह्यात अटक केल्याने गुन्ह्याची चौकशी करत असताना, शुशोभिकरणाचे प्रकरणाचा त्रास आम्हाला होत असल्याने ते थांबविण्याची वारंवार विनंती पोलिसांनी केली असल्याचे सदर गुन्हातील जामिनावर मुक्त असलेले आरोपी रामदास घावटे यांनी सांगितले. अशा प्रकारे पारनेर पोलिस खात्याचा धाक दाखवत आपला आवाज दाबत असल्याचे घावटे यांनी सांगितले.
शुशोभिकरण प्रकारणात पोलिसांनी लवकर हिशोब जनतेसमोर सादर करावा अशी मागणी त्यांनी केली.