न्यू इंग्लिश स्कूल पिंपरी(घु) चा 100 टक्के निकाल
अहमदनगर / प्रतिनिधी ।
मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाला नुकताच जाहीर झाला असून, रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलपिंपरी (घु) ता. आष्टी, जि. बीड चा निकाल 100 टक्के निकाल लागला असून, विद्यालयामध्ये ओंकार शामराव पांडूळे याने 88.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला, तर सुवर्णा रामेश्वर पांडूळे हीने 83 टक्के गुण मिळवून दुसरा तर, नवनाथ तुकाराम परकाळे 82 टक्के आणि कोमल भाऊसाहेब पांडुळे 82 टक्के यांनी तृतीय क्रमांक मिळविला. निकालाची परंपरा विद्यालयाने स्थापनेपासून कायम राखली आहे. या निकालात विशेष प्राविण्य मिळविण्यात 11 विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये 21 विद्यार्थी तर, द्वितीय श्रेणीमध्ये 2 विद्यार्थी पास झाले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व अध्यापन करणार्या शिक्षकांचे स्थानिक स्कूल कमिटीचे शाखासंस्थापक चेअरमन देविदास पांडूळे, आष्टी नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. विलास सोनावणे, मा. राज्यमंत्री सुरेश धस, ना. तहसीलदार प्रदिप पांडूळे, सरपंच रूख्मिनी पांडूळे, उपसरपंच कांताबाई परकाळे, सर्व सदस्य, हभप. रूपचंद पांडूळे, भाऊसाहेब वारूळे, भाऊसाहेब पांडूळे, बबन पांडूळे, पंचक्रोशीतील नागरिक आदींनी अभिनंदन केले.