Breaking News

जातीय सलोख्यासाठी शिरखुरमा पार्टीचे आयोजन


राहुरी तालुका प्रतिनिधी

लहान मुलांच्या मनात जातीय सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने रमजान ईदनिमित्त राहुरी शहरातील मुस्लिम बांधवांच्यावतीने ग्लोबल इंग्लिश मेडियम स्कूल येथे बुधवारी {दि.२०} दुपारी शिरखुरमा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नगरपरिषद शिक्षण मंडळातील प्रशासन अधिकारी कुंभारे, शाळेचे प्राचार्य रामकिसन ढोकणे, छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, सामाजिक कार्यकर्ते बिलाल शेख, शिक्षक साठे आदी उपस्थित होते. सध्या समाजात सुरु असलेला जातीयवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी व समाजात जातीय सलोखा निर्माण व्हावा, यासाठी बालवयातच मुलांच्या मनावर विविध समाजाबाबत जनजागृती करावी, एक उत्कृष्ट समाज घडविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला, असे सामाजिक कार्यकर्ते बिला शेख यांनी सांगितले. प्राचार्य रामकिसन ढोकणे यांनी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसिम शेख, सोनल शेख, फारुक शेख, राजू शेख, अरिफ इनामदार, मुस्ताक पठाण, अफरोज खान, अमिन पठाण, सलिम पठाण, रफिक शेख, सलमा इनामदार, शाळेच्या संचालिका सारिका ढोकणे यांनी विशेष परिश्रम घेतले.