गौतम पब्लिक स्कूलमध्ये योगदिन उत्साहात
कोपरगाव ता. प्रतिनिधी
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी चौथा जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेच्या भव्य मैदानावर एन. सी. सी., स्काऊट गाईड व इतर विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरविले. यावेळी प्राचार्य नूर शेख, फिजिकल डायरेक्टर सुधाकर नीलक, शिस्त विभाग प्रमुख रमेश पटारे यांच्या समवेत जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले, गौतम पब्लिक स्कूलमध्ये हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, स्विमींग, व्हॉलीबॉल, मल्लखांब आदी खेळ सातत्याने खेळले जातात. रोज सकाळी सर्व विद्यार्थ्यांसाठी आवर्जून योग प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे गौतम पब्लिक स्कूलने सर्व क्रिडा प्रकारामध्ये आपले अस्तित्व व वर्चस्व टिकवून ठेवले आहे. सर्व विद्यार्थी मानसिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून नियमितपणे योगासणे करून घेतले जातात.
संस्थेचे विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे व मानद सचिव चैताली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेत आहे. योगासनामुळे अभ्यास व खेळाचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी अतिशय सोपे जाते. त्यामुळे दरवर्षी शाळेचा १०० टक्के निकाल व विविध खेळामधील प्राविण्य नेहमी दिसून येत असल्याचे सांगितले.
जागतिक योगदिनानिमित्त संस्थेचे चेअरमन माजी आ. अशोक काळे, व्हा. चेअरमन छबुराव आव्हाड, विश्वस्त युवा नेते आशुतोष काळे, चैताली काळे, सहसचिव स्नेहलता शिंदे आदींनी विद्यार्थ्यांना जागतिक योगदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
