Breaking News

डाळिंब उत्पादकांना ७ कोटी विमा मंजूर


संगमनेर प्रतिनिधी

यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सर्वाधिक विमा संगमनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांना मंजूर झाला आहे, अशी माहिती बँकेचे उपाध्यक्ष रामदास वाघ आणि थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली. 

ते म्हणाले, तालुक्यातील डाळिंब उत्पादकांना ७ कोटी ६३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मंजूर झाला आहे. 

तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांमार्फत शेतकरी सभासदांपर्यत कर्ज पुरवठा आणि सवलती पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे प्रत्येक शेतकर्‍यांचे जीवनमान उंचवण्यिाचे काम झाले आहे. कायम दुष्काळी परिस्थिती असलेल्या संगमनेर व अकोले तालुक्याने सहकार महर्षी स्व. ऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या कर्ज वसुलीच्या शिस्तीमुळे बँकेत संस्कृती निर्माण झाली आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँक अडचणीच्या काळातही शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. दरम्यान, विम्याची ही रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याचे तालुका विकास अधिकारी बापूसाहेब गिरी यांनी सांगितले.