Breaking News

दत्तनगर भागांत पोलिसांचा छापा


राहुरी विशेष प्रतिनिधी

शहरातील दत्तनगर भागात पत्त्याच्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणारे सहा जण रंगेहात पकडले. दि. ३ सायंकाळी ७ च्या दरम्यान शहरातील दत्तनगर येथे एका टपरीच्या आडोशाला राजू लक्ष्मण साळुंके, रजत मदन परदेशी, सोमेश बबन देशमुख, नाना संपत हिवराळे, अक्षय संतोश सोनवणे {सर्व रा. दत्तनगर राहुरी}, शशिकांत श्रीधर कोरडे {रा. तनपुरेवाडी रोड राहुरी} हे सर्व तिरट नावाचा हरजितचा जुगार खेळत असल्याची गुप्त खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून एक हजार २० रुपये व जुगार साहित्य, पत्ते जप्त करण्यात आले आहेत.