Breaking News

संजीवनी’च्या विध्यार्थ्यांना नोकरी


कोपरगांव : येथील स्थापत्य अभियांत्रिकी आणि विद्युत उर्जा विषेतः सौर आणि पवन उर्जा क्षेत्रातील जग विख्यात स्टर्लिंग अॅण्ड विल्सन या शापूर्जी पालोनजी उद्योग समुहाच्या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या चार व संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्या तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत नोकऱ्यांसाठी निवड करण्यात आली. प्रशिक्षण काळात पदवी अभियंत्यांना रू ३. ३८ लाखांचे तर पदविका अभियंत्यांना रू २. ५ लाखांचे वार्षिक पॅकेज देवु केले आहे. संजीवनीच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागा मार्फत अंतिम वर्षातील वर्षातील विध्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याची शृंखलेला अधिक बळकटी मिळत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.