Breaking News

अल्पवयीन मुलीची आठव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या

मुंबई - अल्पवयीन मुलांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कांदिवली पूर्व ठाकूर व्हिलेज येथील आर्चिड इमारतीत राहणार्‍या मुलीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हर्षिका धिरेंद्र मायावशी असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून ती नववीत शिक्षण घेत होती. हर्षिता कांदिवलीतील गुंडेच्या शाळेत शिक्षण घेत होती. तिला वाचवण्यासाठी इमारतीतील नागरिकांनी प्रयत्न केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. तिने इमारतीवरुन उडी मारल्यावर तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी हर्षिताला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. समता नगर पोलीस याबाबत तपास करत आहेत.