Breaking News

भाजपचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित- संजय राऊत

भाजपचा हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले, काश्मीरमध्ये ही युती झाली, तेव्हा ती अभद्र युती असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. ती टिकणार नाही असं उद्धव ठाकरे म्हटल्याचंही राऊत म्हणाले. काश्मीरमध्ये हे सरकार आल्यानंतर हिंसाचार वाढला असल्याचं राऊत म्हणाले. 2019ची निवडणूक लक्षात घेता भाजपनं पाठिंबा काढून घेतला आणि हे राजकारणानं प्रेरित असल्याची टीका त्यांनी केली.