Breaking News

अनोळखी भामट्यांनी १ लाख लांबविले


कोपरगाव शहर प्रतिनिधी:
कोपरगाव-पुणतांबा रस्त्यालगतच्या सावील अॅग्रोजवळ विना नंबरच्या पल्सर या दुचाकीवरून तीन अज्ञातांनी येऊन १ लाख ०२ हजार ३३० रुपयांची रोकड लंपास केली. रमेश झिने {वय २८ रा. पुणतांबा} हे पुणतांबा येथून कोपरगावच्या दिशेने मित्रासोबत दुचाकीवरून देशी दारूची रोख रक्कम नॅशनल रोड लाईन्स कोपरगाव येथील ऑफिसवर जमा करण्यासाठी जात होते. दरम्यान, रमेश झिने व त्याचा मित्र गौरव यांच्या दुचाकीला बिगर नंबरच्या पल्सर या दुचाकीवरून येणाऱ्या २५ ते ३० वयोगटातील तीन अज्ञात तरुणांनी चालू दुचाकीला लाथ मारून बळजबरीने १ लाख ०२ हजार ३३० रोकड आणि निळ्या रंगाची स्कूल बॅग लंपास केली. याप्रकरणी रमेश झिने यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.