Breaking News

वाळूतस्करांची मजल गेली विनयभंगापर्यंत!


।संगमनेर/प्रतिनिधी।
शहरासह तालुक्यात प्रवरा आणि म्हाळुं. गी नदीपात्रातून अवैध वाळूउपसा सुरु आहे. या टोळ्या अधिकाऱ्यांच्या आशिदाने प्रचंड मुजोर झाल्या आहेत. या वाळूतस्करांची मजल थेट महिलेच्या विनयभंगापर्यंत गेली आहे. यासंदर्भात एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तीन वाळू तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला. 

आज {दि. १५} दुपारी चारच्या सुमारास प्रवरानदी काठालगत संगमनेर खुर्द शिवारातील वैदूवाडी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील महिला आणि तिच्या पतीने वाळूतस्करांना त्यांच्या परिसरातून वाळू वाहतूक करताना अडवले. त्यामुळे वाळू तस्करांनी महिलेच्या घरी जाऊन महिलेला शिवीगाळ केली. तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी तनवीर शेख, सवगऱ्या शिंदे, बापजी शिंदे (दोघेही रा. संगमनेर खुर्द) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.