भारतीय सैन्याकडून पाकचे बंकर उध्दवस्त पाक रेंजर्सकडून गोळीबार थांबवण्याची विनंती
नवी दिल्ली - भारतीय सीमारेषेवर सुरू असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतींना भारतीय सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तर पाकची दाणादाण झाली आहे. अखेर पाक रेंजर्सने फोन करून बीएसएफला गोळीबार बंद करून शांतता राखण्याचे आवाहन केले. आंतरराष्ट्रीय सीमेवर असलेला पाकिस्तानचा बंकर भारतीय सैनिकांनी उद्धवस्त केला. भारतीय सैन्याने कारवाईचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. त्याला प्रत्युतरादाखल भारताने कारवाई करत चोख प्रत्युत्तर दिले. 19 मे रोजी भारतीय सैन्याने ही कारवाई केली.
सीमारेषेवरच्या पाकिस्तानच्या कागाळ्या काही थांबायला तयार नाहीत. पश्चिमी आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले जात आहे. भारतीय सैनिकांनी पाकला जशाच तसे उत्तर दिल्याने गोळीबार करणार्या पाकिस्तानी चौक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चिकन नेक परिसरात पाकचा एक खंदक उध्वस्त करण्यात आला आहे. संरक्षण विभागानं या कारवाईचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने 19 सेकंदाचा थर्मल-इमेजरी फुटेज रिलीझ केलं आहे. ज्यात पाकिस्तानी बंकर नष्ट करण्यात आला आहे. भारताने पाकिस्तान विरोधात ही मोठी कारवाई केली आहे. बीएसएफने पाकिस्तानी रेंजवर हल्ला केला. या गोळीबारात बीएसएफचे दोन जवानही शहीद झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ दिसून आली होती. या गोळीबारात अनेक नागरिकही मारले गेल्याचे आ णि जायबंदी झाल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत काश्मीर खोर्यात गोळीबाराच्या 700 हून अधिक घटना घडल्याचे सांगण्यात येते.
पाकची गोळीबार थांबवण्याची मागणी
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानची चांगलीच दाणादाण उडाली. अखेर पाक रेंजर्सने फोन करून बीएसएफला गोळीबार बंद करून शांतता राखण्याचे आवाहन केले. पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवानासह पाच नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर बीएसएफने प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली होती. बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेनजीक असलेल्या पाकिस्तानी चौकीलाच उडवून दिले.