Breaking News

अफवांवर विश्‍वास ठेवू नका - आ.बाळासाहेब थोरात.

संगमनेर प्रतिनिधी  - पोरधरी या अफवेचा बळी ठरून समनापूर येथे मारहाण झालेल्या झरेकाठी येथील बहुरुपी कलाकार आबा शिंदे या युवकाला माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाच्यावतीने मायेचा आधार मिळाला. आ. थोरात यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.

आ. थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयात नामदेव कहांडळ, विजय हिंगे यांनी आबा शिंदेला बोलावून घेतले. थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, नारायण कहर, आबाची आई , भास्कर खेमनर, पुंजाहरी दिघे, अनिल सोमणी, रमेश नेहे, अजित सरोदे, सचिन खेमनर आदी उपस्थित होते.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका 

राज्यात सर्वत्र अनेक अफवा असून पोरधरी ही अफवा मोठी फोपावली आहे. राज्यात बहुरुपी हा समाज दारोदार फिरुन उदरनिर्वाह करीत आहे. मात्र त्यांच्यावर गैरसमज व अफवांतून हल्ले होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये.