Breaking News

कुटुंब आधार योजना सात लाख रुपयांच्या चेकचे वाटप

जामखेड / ता. प्रतिनिधी । शिक्षक बँक जामखेड येथे अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेमार्फत दिला जाणार्‍या कुटुंब आधार योजनेअंतर्गत मयत सभासद कै. अरुण गवते शाळा फक्राबाद यांचे वारसदार पत्नी मीनाक्षी गवते यांना व कै. अशोक जाधव, शाळा पाडळी यांचे वारसदार वडील रामदास जाधव (सुतार) यांना प्रत्येकी सात लाख रुपयांच्या चेकचे वितरण बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहकले यांचे हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानोबा थोरात (माजी व्हा. चेअरमन) हे होते.

याप्रसंगी विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संजय म्हस्के, बँकेच्या व्हा. चेअरमन विद्युलता आढाव, संचालिका मंजुषा नरवडे, संचालिका सीमा निकम, शिक्षकनेते राम निकम, निळकंठ घायतडक, संतोष राऊत, नारायण लहाने, दिगांबर पवार, आशा सोळशे यांचे उपस्थितीत पार पडला. यावेळी ज्या शिक्षक सभासदांना मुलगी झाली त्या मुलींचे नावे कन्यारत्न ठेव योजनेअंतर्गत 11 हजार रुपयांच्या ठेव पावतीचेही वितरण यावेळी करण्यात आले. तसेच एमपीएस्सीमार्फत विक्रीकर उपायुक्त वर्ग 1 पदी निवड झालेल्या प्रतिक्षा पोपट भुते यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना चेअरमन रावसाहेब रोहोकले म्हणाले की, शिक्षक बँकेमार्फत आमच्या सभासदांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यापैकी एखादा सभासद मयत झाल्यास त्याचे सर्व कर्ज म्हणजे 18 लाख रुपये माफ केले जातात, त्याचे वारसदारास 7 लाख रुपये कुटुंब आधार योजनेमधून दिले जातात. यातून त्यांच्या दुःखद कुटुंबास सावरण्यास मदत होते. सर्व सभासदांकडून या कुटुंबास मदतीचा हात दिल्याची भावना निर्माण होते. कुटुंबप्रमुखाचा आधार गेल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाला या योजनेमुळे आधार मिळतो. तसेच कन्यारत्न ठेव योजनेमध्ये एखाद्या सभासदास मुलगी झाल्यास तिच्या नावे बँक 11 हजार रुपये 18 वर्षासाठी मुदतठेवीत ठेवते, आणि 18 व्या वर्षी व्याजासह मुलीला सदर रक्कम देते. या योजनेमुळे शासनाच्या ’लेक वाचवा, लेक शिकवा’ या योजनेचा प्रचार आणि प्रसार होतो. यावेळीप्रतिक्षा भुते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास लक्ष्मीकांत देशमुख, गोकुळ गायकवाड, सुरेश मोहिते, रघुनाथ कात्रजकर, माजिद शेख, किसन वराट, दादा चव्हाण, दत्ता आंधळकर, प्रमोद जोशी, श्रीहरी साबळे, उत्तम पवार, मुकुंद सातपुते, बबन गव्हाने, प्रवीण पवार, अर्जुन पवार, राजू कर्डिले, कांतिराम बर्डे, युवराज जाधव, ज्ञानदेव कोरडे, बाळू रोहकले, मनोज दळवी, वैजीनाथ गीते, रविंद्र तांबे, हनुमंत निंबाळकर, विनोद सोनवणे, आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हांतर्गत बदलीने तालुक्याबाहेर बदली झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम निकम यांनी तर, सूत्रसंचालन नारायण लहाने यांनी केले. आभार बाळासाहेब रोहोकले यांनी मानले.