Breaking News

क्रांती ज्योती विद्यालयाचा 98 टक्के निकाल

जवळा / प्रतिनिधी । 
क्रांती ज्योती उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल 98 टक्के लागला असून, किशोर शिंदे या विद्यार्थ्यांने 78.46 टक्के गुण संपादन करीत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. प्रियंका शिंदे 75.46 टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळविला, अनिकेत जाधव यांनी 75.23 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविल्याची माहिती प्राचार्य.सानप यांनी दिली.
प्राचार्य सानप म्हणाले की, जादा तासिका, प्राध्यापकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच, हे यश मिळाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला, यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजिनाथ हजारे, दशरथ हजारे, विष्णू हजारे, मारुती रोडे, किरण वर्पे, जवळा गावाचे सरपंच अनिल पवार, उपसरपंच गौतम कोल्हे, जवळा वि.वि.का.सोसायटीचेे चेरमन प्रदीप पाटील, ग्रा.पं. सदस्य शरद हजारे, सा. कार्यकर्ते राजेंद्र राऊत, अभय नाळे, जवळा विकास सहमूहाचे सावता हजारे, अशोक पठाडे, किरण हजारे, संदेश हजारे, मुकुंद रोडे, प्रफुल्ल कोकाटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अजिनाथ हजारे यांनी सांगितले की, जवळा सारख्या ग्रामीण भागात क्रांती ज्योती उच्च माध्यमिक विद्यालय झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाच्या शालेय शिक्षणाची सोय झाली. त्याचबरोबर ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनीही यश संपादन केले असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.