Breaking News

डीएसकेंच्या मुलाला शरण येण्याचे आदेश

मुंबई - आर्थिक घोटाळ्यात अडकलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला आज मुंबई उच्च न्यायालयाने शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. शिरीषने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, शिरीषला दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. 


येत्या शुक्रवारपर्यंत डीएसके यांच्या मुलाला शरण येण्यासंबंधीचा निर्णय कळवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश मिळाले आहेत. आर्थिक घोटाळ्यात शिरीष कुलकर्णींच्या अटकपूर्व जामीनावर युक्तिवाद ऐकण्यास न्यायालयाला स्वारस्य नाही, असे म्हणत शिरीष स्वत:ला डीएसके या ब्रँडपासून वेगळे करू शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.