Breaking News

पावसाळी कामे पुर्ण करण्याचा दावा फोल

पुणे : पुणे शहरात मान्सुन पुर्व पावसाला सुरवात झाली असली तरी पावसाळयापुर्वीची कामे अदयापही पुर्ण झालेली नाही. त्यामुळे पुर्वी पावसाळी कामे पुर्ण करण्याचा दावा फोल ठरला आहे. पालिकेच्या यंत्रणेचा अक्षरक्षा फज्जा उडाला आहे. महापालिका प्रशासनाकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी विविध कामे हाती घेतली आहेत. यामध्ये रस्त्यांवरील खड्डे दुरूस्त करणे, पावसाळी लाईन टाकणे, नालेसफाई करणे, खोदालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करणे, दुभाजक, पदपथ दुरुस्ती आदींचा समावेश असतो. ही कामे वेळेत पूर्ण केली जात नसल्याने दरवर्षी शहरात थोडा पाऊस झाल्यानंतर रस्त्यांवर पाणीच पाणी साचते आणि रस्ते खड्डेयुक्त होतात. या पार्श्‍वभूमीवर पालिकाहद्दीतील सर्व मुख्य आणि अंतर्गत पावसाळी वाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या, नालेसफाई आदी पावसाळापूर्व कामे मे महिनाअखेर पूर्ण करण्याचे आदेश पालिका प्रशासनाने आणि पालिकेतील पदाधिका-यांनी संबंधीत क्षेत्रीय कार्यालयांना दिले होते. त्यावरही शहरातील पावसाळापूर्व कामे अपूर्णच राहिल्याची प्रचिती शहरातील बहुतांशी रस्तांवर पुणेकरांना आली. पावसाळ्याच्या प्रारंभीच शहर व परिसरात वरूण राजाने दमदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे दरवर्षीचा पावसाळ्याचा अनुभव डोळ्यासमोर ठेऊन गाफील राहिलेल्या पालिका प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे. शहरात सांयकाळी झालेल्या दमदार पावसामुळे पेठांसह उपनगरातील बहुतांशी रस्त्यांवर एक ते दोन फुट पाणी साचले होते. मार्केटयार्ड परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दुचाकी चालविणे आणि पायी जाणे अशक्य झाले होते. * नो पार्किंग आणि नो व्हॉल्टिंग स्वरुपात बदल * सार्वजनिक वाहतूक सोयीची होण्याच्या दृष्टीने शहरातील वाहतूक व्यवस्थेत थोडेफार बदल करण्यात आले आहे. प्रामुख्याने नो पार्किंग आणि नो व्हॉल्टिंग अशा स्वरुपाचे हे बदल आहेत. गर्दीच्या ठिकाणी सोयीस्कर होण्याकरीता हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वाहतूक विभागाच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.शिवाजीनगर वाहतूक विभागार्तंगत वीर चाफेकर चौकाकडून न.ता.वाडी चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावर 15 मीटरवर दोन्ही बाजून पार्किंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मंगल गॅस पंपासमोरील साखर संकुलसमोर नो पार्किंग करण्यात आले आहे. तर ऍग्रो ऑफिस ते दळवी हॉस्पिटल दरम्यान समांतर पार्किंग करण्यात आले आहे. तर दळवी हॉस्पिटल ते कलाकृती टेक्सस्टाईल्स पर्यंत रोडच्या पश्‍चिम बाजूस फक्त दुचाकी वाहनांना पार्किंगची परवानगी देण्यात आली आहे.चतुःश्रृंगी वाहतूक विभागार्तंगत सेनापती बापट रोडलगत रत्ना हॉस्पिटल समोरील लेनमध्ये गिरीधर बंगला ते साई मंदीर रस्त्यावर नो पार्किंग करण्यात आले आहे.तर दौलत मंगळवेढेकर चौक ते गिरीधर बंगल्यासमोरील डी.पी पर्यंत समांतर पार्किंग करण्यात आले आहे. कोथरूड वाहतूक विभागार्तंगत कर्वेपुतळा चौक ते शिवाजी पुतळा चौकापर्यंत दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनांना पार्किंग करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर भेलकेनगर सर्कल ते आत्रेय सोसायटी कॉर्नरपर्यत दुचाकी वाहनांना दुतर्फा पार्किंग करण्यात आली आहे. तर ट्रक, बस, कार, टॅम्पो आणि जड वाहनांना नो पार्किंग करण्यात आली आहे.