Breaking News

शेवगाव नगराध्यक्षावर अविश्‍वास ठराव दाखल

रवि उगलमुगले, शेवगाव - पालिकेच्या नगराध्यक्षा विद्या अरुण लांडे यांच्या विरोधात आज 21 पैकी 15 नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्‍वास ठराव दाखल करत या विषयावर तातडीने विशेष बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे. अविश्‍वास ठराव दाखल करण्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुद्धा सहभागी झाल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांची पालिकेवरील पकड सैल झाली असल्याचे मानले जात आहे. या बाबद अधिक माहिती अशी की शेवगावला नगरपालिका झाल्यानंतर पहिल्यांदाच चुरशीची लढत होऊन सत्त्ताधारी राष्ट ्रवादीचे नऊ, भाजप चे आठ तर अपक्ष चार नगरसेवक निवडून आले होते. काही अपक्षांची मदत घेत राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता आपल्या ताब्यात मिळवण्यास यश मिळवले. नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असताना चंद्रशेखर घुले यांनी आपले कट्टर समर्थक व पं.स. चे माजी सभापती अरुण लांडे यांच्या पत्नी विद्या लांडे यांची नगराध्यक्षपदी निवड केली. पालिका निवडणूक होऊन दोन वर्षांचा कालावधी होऊनही लांडे व त्यांच्या स्वपक्षातील नगरसेवक व विरोधी नगरसेवक यांच्यात वारंवार वाद होऊन त्याचा परिणाम शहराच्या विकासावर होऊन पा लिका ऐवजी ग्रामपंचायत बरी होती असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली होती. साधारणतः सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनीच लांडे यांच्या राजीनामा घ्या असे साकडे चंद्रशेखर घुले यांना घातले होते मात्र त्या वेळी हे बंड थंड करण्यात घुले यशस्वी झाले होते. मात्र काळाच्या ओघात पहिले पाढे पंचावन्न झाल्याने आज 21 पैकी 15 नगरसेवकांनी जिल्हा धिकार्‍यांची भेट घेत अविश्‍वास ठराव दाखल करत या विषयावर तातडीने विशेष सभा आयोजित करण्याची मागणी केली. या संदर्भात दिलेल्या मागणीपत्रावर राष्ट्रवादीचे पालिकेतील गटनेते सागर फडके यांची सुद्धा सही असून या मूळे राष्ट्रवादी मध्ये दुफळी पडली असल्याचे मानले जात आहे. आज अविश्‍वास ठराव दाखल करणार्‍या पत्रावर वर्षा लिंगे, इंदुबाई म्हस्के, शब्बीर शेख, सागर फडके, अजय भारस्कर, विकास फलके, वजीर पठाण, राणी मोहिते, रेखा कुसळकर, अरुण मुंडे, नंदा बोरुडे, सविता दहिवाळकर, अशोक आहुजा, कमलेश गांधी, शारदा क ाथवटे यांच्या सह्या आहेत.
चौकट - नगराध्यक्षा विद्या लांडे यांच्यावरील अविश्‍वास ठराव जर पारित झाला तर नगराध्यक्ष पदाचे पुढील आरक्षण हे मागासवर्गीय महिला राखीव असल्याने अविश्‍वास ठराव दाखल क रणार्‍या गटातून राणी मोहिते यांना संधी मिळू शकते तर राष्ट्रवादीच्या गोटातून विजयमाला तिजोरे यांना संधी मिळू शकत असल्याने आता नगराध्यक्षपदी मोहिते कि तिजोरे याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.