Breaking News

कन्या विद्यालयास सीसीटीव्ही भेट


जामखेड / ता. प्रतिनिधी 
विकास व घाडगे पाटील एजन्सीचे संचालक आणि स्वामी विवेकानंद स्वयं सहायता गटाचे अध्यक्ष विकास पवळ यांनी आज रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालय, जामखेडच्या संकुलात सी.सी.टी.व्ही. यंत्रणा देणगीस्वरुपात देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. मातोश्री कै. सुलोचना कल्याण पवळ यांच्या पुण्यस्मरणार्थ ही देणगी विद्यालयास देताना ते म्हणाले की, मुलींच्या सुरक्षेसाठी व शिस्तीसाठी ही यंत्रणा गरजेची आहे.रयत शिक्षण संस्था ही बहुजनांची शाळा आहे. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीला पोषक वातावरण मिळावे, या हेतूने मी आठ कॅमेर्‍याचा हा संच कन्या विद्यालयास देत आहे.
एका मुलीने यावेळी बोलताना सांगितले की, आता आम्हाला भांडणेही करता येणार नाहीत, आम्हाला आता अभ्यास करुन देशासाठी काहीतरी करायचे आहे. मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, दिलीप ढवळे, सुनिल वारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. स्कूल कमिटीचे अध्यक्ष विष्णुपंत मुरुमकर, एम. के. भोसले, अशोक निमोणकर, बापुसाहेब घाडगे, शरद यादव, दत्तात्रय काळे, सुनिल उगले, जयसिंग उगले, अरुण उगले, मनोज बन, जयहरी शिंदे, किरण रेडे, प्रदिप जगदाळे व सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी हैदर सुभेदार यांनी प्रत्येक वर्गात वॉल वॉच देण्याचे जाहीर केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी विकास पवळ यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन संतोष सरसमकर यांनी तर, आभार मडके यांनी मानले.