आ. कोल्हेंनी दिलेला शब्द केला खरा!
कोपरगाव शहर प्रतिनिधी :
तालुक्यातील कोळगांवथडीवासियांसाठी ५२ लाख ६४ हजार रूपये खर्चाच्या कामास मुख्यमंत्री पेयजल योजनेतून मंजुरी घेत त्याचे भूमिपूजन मार्चमध्ये आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या योजनेसाठी घेण्यात आलेल्या विहीरीस पाणी लागले असून जूनमध्ये त्याचे जलपूजनही करण्यात आले. येथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरविणार, असा शब्द आ. कोल्हे यांनी दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखविला असून स्थानिक ग्रामस्थांनी यामुळे समाधान व्यक्त केले आहे.
पिण्याच्या पाणी योजनेबाबत कोळगांवथडीत मोठे राजकारण झाले. पण आता त्या सर्वांनीच तोंडात बोटे घातले आहेत. पाणी हा प्रत्येकाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यासाठी महिला भगिनींना मोठी धावपळ करावी लागत असते. पाण्याची किंमत महिलांनाच जास्त आहे. एक महिला आ. या नात्याने आ. कोल्हे यांनी कोळगांवथडीवासियांच्या भावना जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या योजनेचा सातत्याने पाठपुरावा केला. कोळगांवथडीबरोबरच उक्कडगांवचीही पाणी योजना मंजूर करून घेतली. पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडेही याबाबत बैठका घेतल्या. मतदार संघातील अन्य ठिकाणच्याही पाणी योजनांबाबत तसेच कोपरगांव शहरवासियांसाठी पाणी योजनाही प्राधान्यांने मंजूर करून घेतली. कोळगांवथडी पाणी योजनेचे मार्चमध्ये भूमिपुजन झाले. हे काम रखडले जाईल, असे अनेकांना वाटत होते. पण युध्दपातळीवर हे काम पूर्ण करण्यासाठी आ. कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. पुंजाजी राऊत आणि त्यांच्या सहका-यांनी या भागातील विहिरीला लागलेल्या पाण्याचे नुकतेच पूजन केले. येथील केशवराव जेऊघाले यांनी या पाणी योजनेसाठी जमीनदान केली आहे.
