Breaking News

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

केवळ योगदिनाच्या दिवशी नव्हे; तर निरामय आरोग्यासाठी रोज योग-प्राणायाम करायचा निर्धार वीरगावातल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तालुक्यातील वीरगाव येथील जि.प. च्या शाळेत आज आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद थोरात, सदस्य बाळासाहेब अस्वले, मुख्याध्यापक दिनकर दातीर, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदर्शन ढगे, संभाजी वैद्य, राम वाकचौरे, भाऊसाहेब चासकर, अनिता भालेराव, रावसाहेब सरोदे, मीनल चासकर, देविदास गिर्‍हे यांनी यावेळी सहभाग घेतला. भास्कर आंबरे यांनी योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. सबाजी दातीर यांनी सूत्रसंचालन केले. आस्वले यांनी योगा-प्राणायामचे महत्त्व लक्षात घेवून प्रतिदिन योगा करायचे आवाहन केले.