घरोघरी ओवाळणी करुन सरपंचांचे स्वागत जनतेतुन निवडलेल्या सरपंचांना मिळतोय अनोखा मान
कुळधरण / प्रतिनिधी ।
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतुन निवडुन आलेल्या सरपंचांचे अनोख्या पध्दतीने स्वागत होत आहे. गावातील पूर्ण जनतेतुन जनाधारावर होत असलेल्या निवडीमुळे उमेदवाराच्या लोकप्रियतेलाच विशेष महत्व असल्याचे अधोरेखित होत आहे. आपल्या पसंतीने गावकारभारी निवडल्याचा आनंदही मतदारांना मिळत असल्याने त्यांच्याकडुन निवडीचे अनोखे स्वागत केले जात आहे. कर्जत तालुक्यातील करमनवाडी ग्रामपंचायत निवडणूकीनंतर कित्येक ग्रामस्थांनी सरपंचांना घरी बोलावुन त्यांचे घरोघरी औक्षण करण्याचा उपक्रम हाती घेतला.
खेड सोसायटीचे संचालक गोरख पावणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भरत संभाजी पावणे यांची सरपंचपदी वर्णी लागली. भरत पावणे हे करमनवाडी गावचे दोन वेळा तंटामुक्तीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात तंटामुक्तीचा पुरस्कारही मिळाला.खेड सोसायटीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. सोसायटीच्या माध्यमातून गणेशवाडी, करमनवाडी, खेड, वायसेवाडी या गावात त्यांनी गोरगरिब जनतेला कर्ज वाटप करून लौकिक प्राप्त केला. त्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीलाही आदर्श पुरस्कार मिळाला. जनतेच्या रेट्यातुन झालेल्या या निवडीमुळे ग्रामस्थांनी त्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. निवडीनंतर त्यांना घरोघरी बोलावले जात आहे. महिला औक्षण करुन त्यांच्या निवडीचे स्वागत करत असुन शुभेच्छा देत आहेत. रमेश मेहेर, शहाजी लांबोर, भरत लांबोर, गणपत सायकर, सागर जाधव, आगत पावणे, शिवाजी पवार,संभाजी मेरगळ, शहाजी हराळे, किसन पवार, विष्णु लांबोर, बाळु सायकर, काशिनाथ खराडे, पोपट पवार, परशुराम राऊत, नंदलाल पावणे,नितीन खर्चे, राम लांबोर, गुलचंद खराडे, शरद पावणे, सखाराम लांबोर, राहुल सुळ, मगन पुणेकर, सोपान मेरगळ, संजय सायकर आदी यामध्ये सक्रिय आहेत.