Breaking News

वैद्यकिय सेवेतील डॉ. कुलकर्णी यांचा प्रेरणादायी नागरी सत्कार

अकोले / प्रतिनिधी । 

वैद्यकिय सेवेत प्रचंड स्पर्धा आणि व्यावसायिक बाजार वाढत असतांना, अकोले तालुक्यात कोतुळ गावी नुकताच एका डॉक्टरांचा नागरी सत्कार संपन्न झाला. लिज्जत पापड पुणे चे कार्यकारी संचालक सुरेश कोते आणि रमेश नेवासकर या दोघांच्या कल्पनेतुन हा सोहळा साजरा करण्यात आला. 1990 सालापासुन डॉक्टर शरद कुलकर्णी यांनी अवघ्या 3 ते 4 रूपयात उपचार सेवा दिली. आजही वयाच्या 85 व्या वर्षी डॉक्टर केवळ10 रूपयांत आरोग्य सेवा देत आहेत. कितीही मोठा किंवा गरिब पेशंट आला तरी, उपचार फी फक्त 10 रूपये. आजही या डॉक्टरचे हॉस्पिटल भेंड्या मातिच्याच घरात आहे. विशेष म्हणजे हे घर स्वताच्या मालकिचे नसुन भाडेतत्वावर आहे. कोतुळ आणि 12 गाव डांगाणातील आदिवासी लोकांची खर्‍या अर्थाने सेवा डॉक्टर कुलकर्णी यांनी केली. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन गावकर्‍यांनी त्यांना रयत शिक्षण संस्थेच्या कोतुळेश्‍वर विद्यालयाच्या कोतुळ अध्यक्ष पदी निवड केली. त्यांनी वैद्यकिय सेवेबरोबरच शैक्षणिक सेवेतदेखिल आपल्या प्रामाणिक कामाने वेगळी ओळख आणि आदर्श निर्माण केला. 


केवढीमोठी ही तन्मयता आणि आपल्या वैद्यकिय सेवेबाबत प्रामाणिकता !
कोतुळेश्‍वर विद्यालयाच्या इमारती डॉक्टरांनी लोकवर्गणीतुन उभ्या केल्या. स्वतः त्यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता. सयाजीराव देशमुख, सयाजीराव पोखरकर, रमेश नेवासकर, पत्रकार मच्छिंद्र देशमुख, सुनिल गिते, तसेच प्रदिप भाटे, सिताराम देशमुख, सा. कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख, सुनिल शहा आणि ग्रामस्थांनी हा अगळा वेगळा गौरव सोहळा आयोजित केला होता. लिज्जत पापड पुणेचे सुरेश कोते यांनी 25 हजार रूपयांचा चेक देऊन डॉक्टरांच्या वैद्यकिय सेवेचा गौरव केला.