Breaking News

मेहंदूरीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात प्रियंका आरोटे प्रथम


मेहेंदुरी / प्रतिनिधी । 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2018 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेहेंदुरीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून, विद्यालयाचा निकाल 92.50 टक्के लागला आहे. विद्यालयात आरोटे प्रियंका गणेश या विद्यार्थिनीने 93 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकविला संकल्प किशोर बंगाळ याने 90 टक्के मिळवुन द्वितीय क्रमांक मिळविला तर, करण त्र्यंबक नवले याने 85 टक्के मिळवून तृतीय क्रमांक मिळविला तर, आरोटे विशाल सुनिल 85 टक्के गुण तसेच, मोरे प्रांजल लहानभाऊ 80.20 गुण, आरोटे निकिता शिवाजी 78.20 गुण मिळवले. शिक्षकांचे मोलाचे योगदान व विद्यार्थ्यांची मेहनत शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी चांगले यश संपादन केले असून, शाळेचादेखील निकाल चांगला लागला, या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्यध्यापक सावंत आर. के, मार्गदर्शक शिक्षक पापळ बी. डी, आभाळे जी. एम, सुनील वाळुंज तसेच पर्यवेक्षक काळे डी. एन शिक्षकेत्तर कर्मचारी हांडे, संगारे ए. व्ही, तंटामुक्ती अध्यक्ष व वि.का.से.सोचे चेअरमन अरुण फरगडे, ग्रामसेविका शेलार ए.के, तलाठी वाकचौरे एस. डी, ग्रा.पं सरपंच रुपाली संगारे, उपसरपंच संजय फरगडे, ग्रा.पं. सदस्य डॉ. अविनाश कानवडे, सुनील बंगाळ, मा. सरपंच भाऊसाहेब येवले, व्हा. चेअरमन भाऊसाहेब वावळे, अ.स.सा. कारखाना संचालक अशोटे आरोटे, माजी मुख्यध्यापक सुधाकर आरोटे तसेच मेहेंदुरी व बहिरवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.