Breaking News

महा ई-सेवा केंद्र चालकास परवाना व नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी 15 जून रोजी प्रशिक्षण


सांगली - महा ई-सेवा केंद्र चालकास अन्न व औषध प्रशासनाकडील परवाना व नोंदणी अर्ज ऑनलाईन भरण्याचे प्रशिक्षण 15 जून रोजी दुपारी 3 वाजता देण्यात येणार आहे. हे प्र शिक्षण हॉटेल ऍ़म्बेसेडर, सांगली - मिरज रोड, सांगली येथे आयोजित केले आहे. या प्रशिक्षणाचा सर्व महा ई-सेवा केंद्रचालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) एस. बी. क ोडगीरे यांनी केले आहे.
कोडगीरे म्हणाले, अन्न व औषध प्रशासनातर्फे देण्यात येणारे अन्न विभागाचे परवाना व नोंदणीचे कामकाज पूर्णपणे ऑनलाईन झाले आहे. नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरणे सुलभ व्हावे याकरीता अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 अंतर्गत नियम व नियमन 2011 जिल्हास्तरीय समितीमध्ये मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात येणार्‍या नवीन परवाना, नोंदणी अर्जाचे महा ई-सेवा केंद्रामार्फत पुरविण्या येणार्‍या सुविधांमध्ये अंतर्भाव करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.