Breaking News

खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते करणार रायगड जिल्ह्यातील खारभूमी योजनांची पाहणी


मुंबई : राज्याचे परिवहन तथा खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते हे उद्या रविवार दि. ३ जून व सोमवार दि.४ जून रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते रविवारी अलिबाग तालुक्यातील मानकुळे,सोनकोठा, हाशिवरे, पोफेरी आणि नवीन मिळकत या खारभूमी योजनांना भेट देणार आहेत. सोमवार दि. ४ जूनरोजी ते उरण तालुक्यातील कोनी केळवणे या खारभूमी योजनेस भेट देणार आहेत.