साईसंस्थांनचे रोजंदारीवरील कामगार मृत्यूच्या दाढेत; ६ महिन्यांत ८ कामगार मृत्यूमुखी
शिर्डी / प्रतिनिधी
साईबाबांच्या दानपेटीत प्रतिदिन दान वाढत आहे. वर्षाकाठी ३ कोटी भाविक शिर्डीत दर्शनासाठी येतात. साईबाबांची संपत्ती ३ हजार कोटी व स्थावर मालमत्ता मोठ्या प्रमाणावर आहे. साईभक्तांच्या सेवेसाठी साडे पाच हजार कामगार दिवसरात्र राबतात. त्यात अडीच हजार कामगार रोजंदारीवर वेगवेगळ्या विभागात खाजगी कंपन्याच्या माध्यमातून ठेकेदारीवर काम करत आहेत. १६-१७ वर्षे झाली तरी ८ ते ९ हजारांच्या पगारावर आज किंवा उद्या कायम होऊ, या अपेक्षेवर काम करत आहेत. मात्र ६ महिन्यांत रोजंदारीवरचे ५ कर्मचारी अपघातात तर ३ हृदय विकाराने असे आठ कामगार मृत्यू पावले आहेत.
रोजंदारीवरचे हे कामगार ५० किलोमीटर परिसरातून ये-जा करतात. कामाचा तणाव, कमी असलेला पगार, घरची चिंता, मुलांचे शिक्षण या चिंतेत पोटासाठी धावपळ करणाऱ्या ५ कामगारांचा जीव अपघातात गेला. ३ हृदय विकाराने मरण पावल्याची माहिती आहे. या कामगारांच्या जीवनात स्थैर्य येण्यासाठी साईबाबा संस्थानने व विश्वस्त मंडळाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
आज {दि. १८ } सावरगाव तळ येथील अण्णासाहेब रंभाजी थिटमे या सुरक्षा रक्षकाच हृदयविकाराने शिर्डीत मृत्यू झाला. पत्नी १ मुलगा १ मुलगी वृद्धवडील असा त्याचा परिवार आहे. ६ महिन्यात अपघात व हृदय विकाराने मृत्यू होणारे थिटमे हे ८ वे कामगार आहे ५ ते ५० किमीवरून पोटासाठी हे कामगार साईबाबा संस्थानमध्ये नोकरीसाठी येतात १२ ते १५ वर्षे काम केल्यानंतरही या कामगारांना फक्त ८ ते ९ हजार रु. पगार दिला जातो. कामासाठी होत असलेली धावपळ, सतत वाढणारी महागाई, कौटुंबिक गरजा याचा या सर्व कामगारांवर परिणाम होत आहे.
कामगारांसाठी रस्त्यावर उतरू
सहा महिन्यात ५ कामगार अपघातात ३ कामगार हृदय विकाराने मृत्यू होतो, हे वाईटच. श्रीमंत देवस्थानचे रोजंदारीवरचे कामगार १५ ते १६ वर्षापासून ८ ते ९ हजार रुपयावर काम करतात. त्यांच्या पगारवाढीसाठी व अन्य मागण्यासाठी आपण साईसंस्थान व राज्य सरकारकडे पाठपुरावा करू. वेळेप्रसंगी रस्त्यावरही उतरू.
संजय शिंदे, अध्यक्ष, शिवसेना, राहाता तालुका
उर्वरित कामगारांना तरी न्याय मिळेल?
रोजंदारीवरचे ६ महिन्यात ८ कामगार काही अपघातात तर काही हृदयविकाराने मृत्यू झाले. त्यांची घरे उघड्यावर आली. मुलांच्या भविष्याचा प्रश्न पुढे आला. कायम होण्याची वाट पाहता पाहता हे कर्मचारी देवाघरी गेले. अजूनही वेळ गेलेली नाही. समाधानकारक पगार व कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी निर्णय घ्या. संघटना केल्या, मोर्चे काढले, अनेकांनी भाषणे, आश्वासने मिळाली. आता पुरे झाले. आता निदान या पुढच्या कामगारांना तरी चांगला पगार व संस्थानने सोडवाव्यात.
एक कामगार, साई संस्थान.